जेव्हा शाहरूख सेटवर पोहचत असे, तेव्हा तो पहिली मागणी दारूसाठी करीत असे. शाहरूखची ही मागणी नित्याचीच झाल्याने, सेटवरील इतर मंडळी त्रस्त झाली होती. दिग्दर्शकांसाठी तर शाहरूख डोकेदुखी ठरत होता. चित्रपटात बरेसचे असे सीन्स आहेत, ज्यामध्ये शाहरूखला दारूच्या नशेत स्वत:ला दाखवायचे होते. शाहरूखला हे सीन्स रिअल दाखवायचे होते, म्हणून तो नियमितपणे सेटवर दारू पित होता. वास्तविक त्याने नशेतच हे सीन्स करावेत असे दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी त्याच्यावर अजिबात दबाव टाकला नव्हता. मात्र शाहरूखने या भूमिकेसाठी स्वत:ला नशेच्या आहारी नेले होते.
शाहरूखची ही मेहनत बघून भंसाली खूपच इम्प्रेस झाले होते. वास्तविक जीवनात शाहरूखने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच मद्यपान केले नव्हते. याचा खुलासा खुद्द शाहरूखनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. मात्र भूमिका जीवंत करण्यासाठी त्याने नशेचा आधार घेतला होता. त्यात तो यशस्वी झाला होता. ‘देवदास’ ही भूमिका शाहरूखच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वांत चांगली भूमिका समजली जाते. या चित्रपटामुळे शाहरूखला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.