बहुतांश चित्रपटात रियल हिरो ऐवजी अॅक्शन सीन देणारा नायक म्हणजे स्टंटमॅन दुसरा असतो. सलमान खानच्या चित्रपटातही असाच एक स्टंटमॅन सलमानचे सर्व अॅक्शन सीन करीत असतो. विशेष म्हणजे सलमानचा प्रत्येक स्टंटवर त्याचे नाव आहे. जाणून घेऊया तो व्यक्ती कोण आहे.
या व्यक्तीचे नाव आहे परवेज काजी. सेम टू सेम सलमानसारखाच दिसणाऱ्या व्यक्तीचे काम म्हणजे सलमानच्या प्रत्येक खतरनाक स्टंटला सामोरे जाणे होय. परवेज स्टंटबाजीचे सर्व फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.
विशेष म्हणजे सलमानच्या बॉडीसारखीच त्याची बॉडी आहे. शिवाय सलमानच्या काही चित्रपटांमध्येही परवेजने काम केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातही काम केले आहे.