कॉलेजमध्ये असताना वरूणचे केस लांब होते. लांक केसांतील वरूण तेव्हाही क्यूट दिसत होता. पण आमच्यामते, त्याची आत्ताची हेअरस्टाईल आधीपेक्षा अधिक चांगली आहे. अर्थात तुमचे मत यापेक्षा वेगळे असू शकते.
सन २०१२ मध्ये वरूणला पहिला ब्रेक मिळाला, तोही करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’ या चित्रपटात. या चित्रपटासाठी वरूणला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’मध्ये वरूण एकदम वेगळ्या लूकमध्ये समोर आला.
वेगळा लूक यासाठी की, त्याच्या या जुन्या फोटोत वरूणने डोळ्यांवर चष्मा लावला आहे. तेव्हाचा वरूण आणि आत्ताचा वरूण यात किती फरक आहे, हेच हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल.
ALSO READ : ‘डायरेक्टर का बेटा’ वरूण धवन बनणार ‘डायरेक्टर’!
वरूणने मुबईच्या एच.आर. कॉलेज आॅफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली. यात एका मित्रासोबतचा वरूणचा हा कॅज्युअल लूक तुम्ही पाहायलाच हवा.
यानंतर ब्रिटनच्या नॉटिंगघम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. या एका फोटोत वरूण त्याच्या मित्रांसोबत कूल मूडमध्ये दिसतोय.
हा एक फोटो तर तुम्ही मिस करायलाच नको. शर्टलेस, लाँग हेअर असा काहीसा वरूण तुम्ही याआधी कधीच बघितला नसेल.