Join us  

साई पल्लवी, अनुष्का शेट्टीच नाही तर साऊथच्या या लोकप्रिय अभिनेत्री अद्याप आहेत सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:42 AM

1 / 11
सध्या सर्वत्र साऊथ सिनेइंडस्ट्रीचा बोलबाला आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्रीची चर्चा बॉलिवूड अभिनेत्रींच्या लोकप्रियतेपेक्षा कमी नाही. दक्षिण भारतीय अभिनेत्रीही हिंदी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. सध्या अनेक साऊथ अभिनेत्रींच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत.
2 / 11
बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी ४१ वर्षांची झाली आहे. अनुष्का आणि प्रभासच्या अफेअरपासून ते लग्नापर्यंतच्या बातम्या मीडियात येत राहिल्या. मात्र, दोघांनी नेहमीच या वृत्तांचे खंडन केले.
3 / 11
अलीकडेच तमन्ना भाटियाच्या लग्नांबद्दलच्या चर्चेला उधाण आले होते की ती एका बिझनेसमनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, अभिनेत्रीनेच या बातम्यांचे खंडन केले आहे.
4 / 11
मल्याळम सिनेस्टार नित्या मेननच्या लग्नाच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या आहेत. नित्याच्या लग्नाबाबतही बरीच अटकळ बांधली जात होती, पण आजतागायत तिने लग्नगाठ बांधलेली नाही.
5 / 11
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग बॉलिवूडवरही राज्य करत आहे. तिने मागील वर्षीच फिल्ममेकर जॅकी भगनानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. दोघेही सीरियस रिलेशनशीपमध्ये आहेत, परंतु त्यांनी लग्नाबाबत कोणतीही योजना केलेली नाही.
6 / 11
अभिनेत्री पूजा हेगडेच्या लग्नाच्या बातमीनेही चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र, सध्या ती लग्न करण्याच्या मूडमध्ये नाही.
7 / 11
तमिळ चित्रपटांची सुपरस्टार साई पल्लवीच्या लग्नाच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या. ज्यामध्ये ती एका बिझनेसमनसोबत अरेंज मॅरेज करू शकते, असे बोलले जात होते. नंतर त्यांच्या कुटुंबाने या बातम्यांचे खंडन करण्यात आले.
8 / 11
अभिनेत्री किर्ती सुरेशच्या लग्नाच्या अफवांबाबतही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पण या निव्वळ अफवा आहेत.
9 / 11
कमल हसनची मुलगी श्रुती हासनचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिका आहे. त्यांनी आजवर लग्नाबाबत काहीही सांगितले नाही.
10 / 11
अभिनेत्री त्रिशा कृष्णन ३९ वर्षांची आहे. अनेकवेळा तिच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते.
11 / 11
अभिनेत्री इलियाना डिक्रूजचे नाव सध्या कतरिना कैफच्या भावासोबत जोडले जात आहे, परंतु तिने अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही.
टॅग्स :अनुष्का शेट्टीसाई पल्लवीपूजा हेगडेइलियाना डीक्रूजरकुल प्रीत सिंगश्रुती हसनतमन्ना भाटिया