‘रईस’चे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यावेळी प्रचंड आनंदात दिसले. शाहरूख सामान्यत: असा चित्रपट करत नाही. पण ‘रईस’साठी शाहरूखने होकार दिला. केवळ होकारच नाही तर त्याने व नवाजुद्दीनने आपल्या भूमिका जिवंत केल्यात.
या पार्टीत ‘जश्न’ होणार पण ‘जाम’ नसणार, असा दावा ‘रईस’च्या टीमने केला होता आणि नेमके झालेही असेच. पार्टीत प्रचंड धम्माल झाली. पण मद्याशिवाय. राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ची बॉक्सआॅफिसवर यशस्वी वाटचाल सुरु आहे. ‘रईस’ हा या वर्षांतील १०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला सिनेमा ठरला आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही ‘रईस’ने चांगली कमाई केली आहे.‘रईस’ गत २५ जानेवारीला रिलीज झाला. याच दिवशी हृतिक रोशनचा ‘काबील’ही रिलीज झाला. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर ‘रईस’ विरूद्ध ‘काबील’ असा संघर्ष रंगला. अखेर ‘रईस’ने या संघर्षात बाजी मारली, असेच म्हणावे लागेल.
ALSO READ : ‘रईस’ची गँग सक्सेस पार्टीत पाळणार ‘ड्राय डे’!
Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज?