काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेले गाणे म्हणजे ‘सलामत’ आणि ‘दर्द’ हे चाहत्यांना बेहद आवडले, आणि आता न्यू साँग ‘तुंग लक तुंग लक’ हे आता रिलीज होण्यासाठी तयार आहे. या गाण्यातील काही स्टिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये ऐश्वर्या एकदम पंजाबी कुडीच्या लुकमध्ये दिसत आहे. रिचा आणि रणदीप यांचा देसी अंदाजही चित्रपटात खुलून दिसतो आहे. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे. रणदीप आणि रिचा यांची केमिस्ट्रीही उत्तम दिसत आहे.