कारण आमिरच्या दोन्ही पत्नींचं नातं मात्र कमालीचे आपुलकीचे आहे की काय असेच म्हणावे लागेल. आमिरचे दुसरे लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीशी त्याचे मैत्री अजुनही कायम आहे.आमिरच्या पानी फॉऊंडेशन या एनजीओची सीईओ त्याची पहिली बायको रिना दत्ता असतानाही किरण राव हिने सत्यमेव जयते वॉटर कप या कॅम्पेनसाठी झटून प्रमोशन करतेय.
निमित्त होते दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं. या स्पर्धेच्या प्रमोशनसाठी किरणने मराठीत गाणे गायले असून पार्श्वगायनात तिने पदार्पण केले आहे.
ही बाब जितकी आकर्षणाची होती तितकंच आमिरची पहिली पत्नी रिना आणि आमिरची दुसरी पत्नी किरण यांचा या कार्यक्रमातील एकत्र वावर. रिना आमिरपासून वेगळी झाली असली तरी याचा कोणताही परिणाम किरण आणि रिनाच्या नात्यावर झालेला दिसला नाही.दोघीही मनमोकळेपणाने एकमेकींशी गप्पा मारत होत्या, मजा मस्तीच्यी मुडमध्ये होत्या .त्यामुळे आमिरच्या अंगणी नांदणा-या दुस-या बायकोशी त्याच्या पहिल्या पत्नीशी तितकेच गोड संबंध असल्याचे या कार्यक्रमातून समोर आले आहे.