Join us

'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:10 IST

1 / 7
२००३ मध्ये आलेला संजय दत्तचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' प्रचंड गाजला. कॉपी करुन डॉक्टर बनायला निघालेला मुन्ना नकळत अनेक लोकांचं आयुष्य रुळावर आणतो.
2 / 7
मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये काही कलाकारांनी कॅमिओ केलं. त्यापैकीच एक अभिनेता विशाल ठक्कर आठवतोय? हा अभिनेता गेल्या १० वर्षांपासून बेपत्ता आहे.
3 / 7
अभिनेता विशाल ठक्करने 'चांदनी बार' या चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याचं नशीब फळफळलं. चांदनी बार नंतर त्याला थेट संजय दत्तसोबत मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
4 / 7
विशाल टीव्ही मालिका 'टँगो चार्ली', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' तसेच 'किस देश में है मेरा दिल'सारख्या चित्रपटांमध्येही दिसला. मात्र,प्रेयसीने विशालवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याचं करिअर पूर्णपणे संपुष्टात आलं .
5 / 7
बेपत्ता होण्यापूर्वी विशाल आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, त्यानंतर प्रेयसीने तिची तक्रार मागे घेतली होती.
6 / 7
एके दिवशी विशाल ठक्करने त्याच्या आईकडून चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये घेतले आणि निघून गेला.त्यानंतर एका पार्टीसाठी जात असल्याचा मेसेज त्याने घरच्यांना केला. मात्र त्यानंतर तो कधी घरी परतलाच नाही.
7 / 7
विशालचा कोणताही पत्ता लागला नाही आणि दोन वर्षांनंतर त्याची प्रेयसीही तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडसेलिब्रिटी