Join us  

क्षण सुखाचे... लाडक्या लेकीसोबत प्रियंका अन् निकचा एन्जॉय, लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 7:19 PM

1 / 8
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा गेल्या महिन्यात 41 वा वाढदिवस साजरा झाला.प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त निकने एक खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
2 / 8
आता निकने पत्नी प्रियंका आणि त्याच्या लाडक्या लेकीसोबतचे काही आनंदाचे क्षण फोटोत कैद केले असून ते सोशल मीडियातून शेअरही करण्यात आले आहेत.
3 / 8
प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये स्वत:चा जलवा दाखवत असताना कुटुंबासमवेतही वेळ घालवत आहे. नुकतेच तिने पती निक व लाडक्या मुलीसोबत सुखाचे क्षण घालवले.
4 / 8
निकने या फॅमिली ट्रीपचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. प्रियंकानेही इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
प्रियंकाने आपल्या मुलीला काखेत घेतल्याचं दिसून येतंय. व्हाईट कलरच्या आऊटफीटमध्ये रात्रीच्या शितल प्रकाशात मायलेकी दिसून येतात
6 / 8
दुसऱ्या फोटोत निकनेही आपल्या पोरीला जवळ घेतल्याचं दिसून येतय. लेकीच्या डोक्यावर हॅट दिसून येत आहे. निकयांकाच्या या फोटोला नेटीझन्स खूप लाईक्स करत आहेत.
7 / 8
समुद्रकिनारी एका बीचवर दोघेही निकयांकासोबत मस्ती करताना दिसून येतात. त्यात, चिमुकली लेकही पाण्यात भिजली असून तिघांच्याही चेहऱ्यावर स्मीत हास्य आहे.
8 / 8
सिटाडेलनंतर प्रियंका चोप्रा आता दुसऱ्या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हेड्स ऑफ स्टेट या चित्रपटात ती अभिनेता जॉन सिना व इद्रिस एल्बासोबत झळकणार आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासबॉलिवूडहॉलिवूड