Join us  

Mili Screening PHOTOS : रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 3:10 PM

1 / 10
जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा सिनेमा आज रिलीज झाला. काल या चित्रपटाची खास स्क्रिनिंग ठेवली गेली. यावेळी अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत.
2 / 10
स्क्रिनिंगदरम्यान जान्हवी व रेखा यांच्यातील बॉन्डिंग बघण्यासारखी होती. रेखा यांनी जान्हवीचं अगदी आईसारखं लाडकौतुक करताना दिसली.
3 / 10
जान्हवी आणि रेखा यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा यांनी जान्हवीला प्रेमाने मिठी मारली. तिचं मायेने चुंबन घेतलं. तिचं मनातून कौतुक केलं.
4 / 10
दोघींनी कॅमेऱ्याला मस्तपैकी पोझही दिल्या. यावेळी रेखा यांनी चंदेरी साडी नेसली होती. या साडीत त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या.
5 / 10
रेखा यांनी जान्हवीवर अगदी प्रेमाचा वर्षाच केला. आईच्या मायेनं त्या स्क्रिनिंगला हजर राहिल्या. जान्हवी यामुळे भारावून गेली.
6 / 10
सनी सुद्धा रेखा यांना भेटला. यावेळी रेखा यांच्याबद्दलचा आदर त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसला.
7 / 10
रेखा भेटताच सनी कौशलने त्यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. सनी कौशलच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकून घेतली.
8 / 10
‘मिली’ हा सिनेमा जान्हवी कपूरचे पापा बोनी कपूर यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात सनी कौशलही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे सनीचं अख्ख कुटुंब या स्क्रिनिंगला हजर होतं.
9 / 10
विकी कौशल हा सुद्धा या स्क्रिनिंगला हजर होता. भावाचा सिनेमा म्हटल्यानंतर त्याने आवर्जुन ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.
10 / 10
जान्हवीच्या मैत्रिणी सारा अली खान व अनन्या कपूर या दोघींनींही ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.
टॅग्स :जान्हवी कपूररेखासनी कौशलविकी कौशलबॉलिवूड