मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची फाईल दाखल केल्यानंतर त्यांनी येथील समुपदेशनाच्या काही सेशन्सला उपस्थिती नोंदवली. कायदेशीर नियमानुसार, एकदा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली की, सहा महिन्यातून एकदा दोघांनाही समुपदेशनच्या सत्राला यावेच लागते. त्यानंतर जर कोर्टाला त्यांच्यातील वाद निवळण्याची चिन्हे दिसली. तरच ते जोडपं पुन्हा पूर्ववत आयुष्य जगू शकतं. नाहीतर, घटस्फोट निश्चितच असतो. मात्र, या दोघांवर समुपदेशन सेशन्सचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसतेय. गोव्यात भेटल्यानंतर त्या दोघांनी कमीत कमी एकमेकांसोबत मित्रांप्रमाणे बोलणे तरी अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या एकमेकांकडे पाहण्याच्या अनोळखी नजरांमुळे मित्रमैत्रिणींमध्ये कुजबुज सुरू झाली. सगळ्यांसोबत असून देखील त्यांच्यात एकमेकांबद्दल अस्वस्थता कायम होती.
लग्नाच्या तब्बल १७ वर्षांनंतर मलायका अरोराने तिचे खान हे आडनाव लावणे टाळून त्यांच्या घरातून बाहेर पडणेच पसंत केले. कधी पार्टी तर कधी बर्थडे बॅशच्या निमित्तानं ते एकत्र येत असतात. मात्र, त्यांच्यातील वाद निवळून वैवाहिक आयुष्य केव्हा पूर्ववत होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.