अनुष्का शर्मा - जोहेब यूसुफ
क्रिकेटर विराट कोहली याच्या प्रेमाचा खुलेपणाने स्वीकार करणाºया अनुष्का शर्माने त्याच्याशी नाते जवळपास तोडले आहे. मैदानातूनच अनुष्काला फ्लार्इंग किस देणाºया विराटला आता तिचे नावही पसंत नाही. पत्रकारांनी त्याला अनुष्काबाबत विचारले असता, त्याचा अचानक भडका उडाला. मात्र अनुष्काचे विराट पहिलेच प्रेम होते, असे अजिबात नाही. जेव्हा ती मॉडलिंग करीत होती, तेव्हा तिचे नाव जोहेब यूसुफ याच्यासोबत जोडले गेले. मात्र अभिनेत्री म्हणून सक्सेस मिळाल्यानंतर अनुष्का आणि जोहेबमध्ये ब्रेकअप झाले.
ऐश्वर्या रॉय - राजीव मूलचंदानी
मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्या रॉयचे नावही बºयाचशा सेलिबेटींशी जोडले गेले. करिअरच्या अगदी सुरुवातीलाच ती राजीव मूलचंदानी यांच्या प्रेमात पडली. पुढे त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या. मात्र त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव सलमान खान, विवेक ओबेरॉय याच्याशी जोडले गेले. त्यानंतर तिचे अभिषेक बच्चन याच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे.
प्रियंका चोपडा - असीम मर्चेंट
बॉलिवूडची देशी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियंका चोपडा सध्या सिंगल जीवन जगत असली तरी सुरुवातीच्या काळात तिचे अनेक सेलिबेटींबरोबर ना जोडले गेले. मॉडलिंगच्या काळात प्रियंकाचे असीम मर्चेंट याच्याशी नाव जोडले गेले होते. २००० सालात मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिचे असीमबरोबर ब्रेकअप झाले.
दीपिका पादुकोण-निहार पांड्या
बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणचे आतापर्यंत बºयाचशा सेलिब्रेटींशी नाव जोडले गेले. सध्या ती अभिनेता रणवीर सिंहला डेट करीत आहे. मात्र जेव्हा दीपिका मॉडलिंग करीत होती, तेव्हा तिचे नाव निहार पांड्या याच्याशी जोडले गेले. दोघांच्या प्रेमांची त्यावेळेस भरपूर चर्चाही रंगली होती. दोघेही ‘लिव-इन रिलेशनशिप’मध्ये होते. पुढे दीपिकाने बॉलिवुडमध्ये एंट्री केल्यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाले.
रणबीर कपूर - अवंतिका मलिक
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेल्या रणबीर कपूर याचे कित्येक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. रणबीरचे सर्वात अगोदर अभिनेता इमरान खान याची पत्नी अवंतिका हिच्याशी प्रेमप्रकरण होते. दोघेही जवळपास पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती आहे.