आपल्या घराच्या जवळपास प्रत्येक कोपºयाचे फोटो वरूणने घेतले आहेत. यापैकी काहीठिकाणी त्याच्या बालपणीच्या आठवणी जुळल्या आहेत तर कुठे फुलांची आरास आहे. घराच्या खिडकीपासून ते घराच्या एन्ट्रीपर्यंतचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
हे आहे वरूणच्या घराचे प्रवेशद्वार. वुडन वॉल आणि या पाय-या चढून गेल्यावर येतो तो वरूणच्या घराचा पत्ता.
ही आहे, वरूणच्या घरातील ड्रार्इंग रूम. यात वरूणच्या घराचा अतिशय सुंदर डिझाईन केलेला दरवाजा दिसतोय. सोबतच एक झाड आणि शोपीसही आहे.
वरूणच्या घरात एक कोपरा त्याच्या चाहत्यांसाठी राखीव आहे. होय, याठिकाणी वरूण त्याच्या फॅन्सने त्याला भेट दिलेल्या वस्तू व कार्ड्स सजवून ठेवतो.
घराच्या एका कोपरा फुलांनी सजवलेला आहे. या फुलांकडे पाहूनच वरूणच्या सुंदर दिवसाची सुरुवात होते.
ही आहे वरूणच्या घराची खिडकी. बाहेर हिरवीगार झाडे आणि आत सूर्याचा कोवळा प्रकाश या फोटोत स्पष्ट दिसतोय.
या फोटोत वरूण त्याचा भाऊ रोहित धवन आणि पापा डेव्हिड धवन याच्यासोबत दिसतोय. त्याच्या मागे एक फोटो फ्रेम दिसतेय. त्याकडे तुम्ही लक्ष द्यायलाच हवे.