चित्रपटात एक पारंपरिक भूमिका साकारणारी अनुष्का रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. देवसेनाच्या साध्या लूक इतकाच तिचा हॉट अवतारही तिच्या चाहत्यांना प्रचंड भावतो.
‘बाहुबली’मध्येही देवसेनाची व्यक्तिरेखा होती. ही भूमिकाही अनुष्कानेच साकारली होती. पण चित्रपटाच्या पहिल्या भागात या व्यक्तिरेखेवर फार फोकस करण्यात आला नव्हता. पण ‘बाहुबली2’मध्ये देवसेनाची व्यक्तिरेखा एकदम प्रकाशझोतात आली.
‘बाहुबली’ व ‘बाहुबली2’पूर्वी अनुष्काने अनेक चित्रपटात अतिशय बोल्ड भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक चित्रपटात तिने इंटीमेट सीन्सही दिले आहेत. बोल्डनेस आणि तितकीच दमदार अॅक्टिंग या बळावर अनुष्का साऊथची सुपरस्टार बनली आहे. मेल डॉमिनेटींग इंडस्ट्रीमध्ये अनुष्काने स्वत:चे एक वेगळे स्थान, वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ALSO READ : कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचे उत्तर झाले लीक
सन २००५ मध्ये पुरी जगन्नाथ यांच्या ‘सुपर’ या तेलगू चित्रपटाद्वारे अनुष्काने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटात नागार्जुन आणि आयशा टाकिया हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.