इंडस्ट्रीमध्ये ज्या मोजक्या अॅक्ट्रेस त्यांच्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जातात, त्यातील एक नाव म्हणजे सोनम कपूर. नेहमीच काही तरी वेगळी स्टाइलकरून लाइमलाइटमध्ये राहणारी सोनमने स्टाइल आयकॉन आणि स्टाइल दिवा म्हणून वेगळीच ओळख निर्माण केली आहे.सोनमचा हाच स्टाइल सेन्स हेरून तिला ‘मोस्ट स्टायलिश अभिनेत्री’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सोनमचा गौरव करण्यात आला.
राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाइलही खास असते. राधिकाचे फॅन्स आज जगभर आहेत.राधिकाच्या या लोकप्रियतेमुळे तिला‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश क्रॉसओव्हर आयकॉन’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राधिकाला हा पुरस्कार सौरभ गाडगीळ आणि गौतम सिंघानिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डान्सिंग स्टाइल,बॉडी स्टाइल आणि,अॅक्टिंग स्कीलमुळे टायगर सध्या यंग जनरेशनसाठी ‘स्टाइल आयकॉन’ ठरत आहे.टायगर श्रॉफच्या या स्टाइलचा गौरव करण्यासाठी त्याला लोकमतने ‘मोस्ट स्टायलीश अभिनेता’ या अवॉर्डने गौरविले आहे. टायगरला हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘लोकमत’ व्यवस्थापकिय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अमृताचे फॅन्स तिचा डान्ससोबतच तिच्या अदा आणि स्टाइलवर फिदा असतात.अमृताला ‘मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस’ या अवॉर्डने गौरविण्यात आले. जयंत म्हास्कर आणि संजय उपाध्याय यांच्या हस्ते अमृताला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
सोनाली बेंद्रेला या पुरस्कार सोहळ्यात ‘मोस्ट स्टायलिश आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उषा काकडे यांनी सोनालीचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला.
दर्जेदार सिनेमांची आशुतोष गोवारीकर यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर’ हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशुतोष गोवारीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राकेश रोशन आणि ‘लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते.
आपल्या सूरांनी शाल्मलीने रसिकांवर मोहिनी घातली आहे. शाल्मलीच्या या लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी तिला ‘मोस्ट स्टायलिश गायिका’ या अवॉर्डने गौरवण्यात आले. संजय सेठी, विजय दर्डा यांच्या हस्ते शाल्मलीला हा पुरस्कार देण्यात आला.
आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाइलने स्वप्नीलने तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. स्वप्नीलच्या याच लोकप्रियतेमुळे तो ‘मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. स्वप्नीलला हा पुरस्कार सहव्यवस्थापकिय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश थिएटर पर्सनालिटीसाठी गायिका प्रियंका बर्वेला राजकीय नेते अमर सिंग यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
आपल्या लेन्सच्या नजरेतून दिग्गजांच्या छबी कॅमेऱ्यात कैद करणारा प्रसिद्ध आणि स्टायलिश छायाचित्रकार म्हणजे अतुल कसबेकर. अतुलने आजवर अनेक बड्या स्टार्सना वेगळी ओळख देऊन नवा ट्रेंड सेट केला आहे. त्यामुळेच त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल या पुरस्कार सोहळ्यात घेतली गेली आहे. त्याला ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा, जितेंद्र आणि नितीन सरदेसाई यांनी अतुलला हा पुरस्कार प्रदान केला.
साजिद नाडियाडवाला यांना त्यांच्या विशिष्ट सिनेमांसाठी ओळखले जाते. सद्यस्थितीत त्यांचे इंडस्ट्रीमधील स्थान महत्त्वपुर्ण असून, फॅन्सनाही नेहमीच त्यांच्या सिनेमाची आतुरता असते. अशा या मोस्ट स्टायलिश निर्माता आणि दिग्दर्शकाला सोहळ्यात ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साजिद नाडियाडवाला यांना हा पुरस्कार प्रताप दिगावकर आणि सज्जन जिंदाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता अशी ओळख निर्माण करत रसिकांचे फेव्हरेट बनलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे महेश कोठारे. मराठीमध्ये धुमधडाका, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, पछाडलेला, माझा छकुला अशा एकाहून एक सरस सिनेमा देणारे महेश कोठारे. आपल्या अभिनयासोबतच दिग्दर्शनाने चित्रपटसृष्टीत एक नवी उंची गाठली आहे.आजही त्यांचा उत्साह आणि कामाचा आवाका तरुणांनाही लाजवेल असाच असतो. त्यांच्या याच असामान्य कर्तृत्वाची दखल घेत या पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे यांना ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने गौरवण्यात आले. लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते महेश कोठारे यांना हा पुस्कार प्रदान करताच उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.
आपल्या आवाजाच्या सामर्थ्याने मलिश्का कोट्यवधींच्या गळ्यातील ताईत बनलेली आरजे मलिश्काला महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘मोस्ट स्टायलिश आरजे’ पुरस्कार प्रदान करत गौरव करण्यात आला.