Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्मिला टागोर यांना मान्य नव्हतं सैफ आणि अमृताचं लग्न, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, "आमच्या लग्नानंतर ती रडली आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:02 IST

1 / 9
पटौडी खान हे बॉलिवूडमधील नावाजलेलं कुटुंब आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या अभिनयातील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होता.
2 / 9
नुकतंच सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८'मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सैफने त्याच्या पहिल्या लग्नाविषयी भाष्य केलं.
3 / 9
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नाला शर्मिला टागोर यांचा विरोध होता, असा खुलासाही सैफने 'कॉफी विथ करण'मध्ये केला.
4 / 9
तो म्हणाला, 'मी तेव्हा गोष्टींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचो. पण, मला सुरक्षितेतचा सहवास जाणवला. म्हणून मी अमृताशी लग्न केलं.'
5 / 9
'अमृताबरोबर जेव्हा गोष्टी चांगल्या होत नव्हत्या. तेव्हा वाईट वाटत होतं. पण, आता आम्ही एकमेकांचा आदर करतो.'
6 / 9
'मी कोणाबरोबर राहत आहे, हे माझ्या आईला माहीत होतं. पण, लग्न न करण्याचा सल्ला तिने मला दिला होता.'
7 / 9
'तेव्हा मी तिला आम्ही लग्न केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आईच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ती रडत होती. पण, माझी आई नेहमीच माझ्याबरोबर होती. जेव्हा मी लग्न केलं तेव्हादेखील आणि घटस्फोटाच्या कठीण काळातही ती सोबत होती.'
8 / 9
सैफ आणि अमृता यांनी २००१मध्ये लग्न केलं होतं. जवळपास १३ वर्षांच्या सुखी संसारानंतर २०१४मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
9 / 9
त्यानंतर २०१२ साली सैफने करीना कपूरशी लग्नगाठ बांधली. त्यांना तैमुर आणि जेह ही मुलं आहेत.
टॅग्स :सैफ अली खान शर्मिला टागोरअमृता सिंग