Join us  

श्रीदेवीची मुलगी खूशी कपूरने इन्स्टा अकाउंट केलं पब्लिक, एकापेक्षा एक फोटो झालेत व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 3:46 PM

1 / 12
अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खूशी कपूर अजून सिनेमात आलेली नाही. पण ती तिच्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत राहते. अनेक वर्षे स्वत:ला लाइमलाईटपासून दूर ठेवणाऱ्या खूशीने नुकतंच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे.
2 / 12
खूशीचं इन्स्टाग्राम बघून हे नक्की लक्षात येतं की, ती जान्हवीपेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय राहते. ती गेल्या पाच वर्षांपासून सतत काहीना काही पोस्ट करत आहे.
3 / 12
जान्हवी कूपरचे फॉलोअर्सही भरपूर आहेत. तिला इन्स्टावर 97273 फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेन्ड होतात.
4 / 12
खूशीचे यावर सिंगल आणि मित्रांसोबतचे फोटो बघायला मिळतात. अर्जुन कपूरसोबतचा देखील एक फोटो आहे.
5 / 12
खूशीच्या बॉलिवूड एन्ट्रीबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. पण अजून अधिकृतपणे काहीच सांगण्यात आलेलं नाही. त्या दृष्टीने तिनेही काहीही केलेलं दिसत नाही.
6 / 12
पण आता खूशीने अकाऊंट पब्लिक केलं आहे तर लोकांना वाटतंय की, ती काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे.
7 / 12
तसे सांगायचे तर खूशी बोनी कपूरच्या अधिक जवळ आहे. स्वत: जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, खूशी बोनी कपूरची फेवरेट आहे. खूशीला नेहमीच जास्त पेंपर केलं गेलं आहे.
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :खुशी कपूरजान्हवी कपूरबॉलिवूडसोशल मीडिया