Join us  

कतरिना कैफ-विकी कौशल हनीमूनसाठी जाणार या ठिकाणी, रिसेप्शननंतर होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 2:31 PM

1 / 8
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडचे असे कपल आहे, ज्यांच्या लग्नाची वाट चाहते बऱ्याच मोठ्या कालावधीपासून पाहत होते.
2 / 8
अखेर कतरिना कैफ विकी कौशलसोबत उद्या म्हणजेच ९ डिसेंबरला लग्नबेडीत अडकणार आहे.
3 / 8
कतरिना आणि विकीचा शाही विवाह सोहळा सवाई माधोपुरमधील सिक्स सेंस फोर्टमध्ये पार पडणार आहे.
4 / 8
मागील काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र आता त्यांच्या हनीमूनबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.
5 / 8
कतरिना आणि विकी सात फेरे घेतल्यानंतर हनीमूनसाठी रवाना होणार आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रिसेप्शननंतर ते दोघे हनीमूनसाठी मालदीव्जला जाणार आहेत.
6 / 8
रिपोर्टनुसार, लग्नानंतर काही काळ कामातून ब्रेक घेत ते दोघे व्हॅकेशन एन्जॉय करणार आहेत. दोघांनी मिळून हनीमून डेस्टिनेशनची निवड केली आहे.
7 / 8
हनीमूनला जाण्याआधी विकी कौशल आणि कतरिना कैफ मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये रिसेप्शन पार्टी देणार आहेत. मात्र अद्याप त्याची तारीख समोर आलेली नाही.
8 / 8
असे म्हटले जात आहे की, रिसेप्शनमध्ये इंडस्ट्रीतील ते सर्व लोक सहभागी होणार आहेत, ज्यांना विकी आणि कतरिना लग्नाला बोलवू शकले नाहीत. विकी आणि कतरिनाच्या लग्नात १२० लोक सहभागी होणार आहेत.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल