कुणी ज्वेलरी डिझायनर तर कुणी शिक्षणात स्कॉलर, वाचा काय करतात Katrina चे आठ भाऊ-बहीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 13:22 IST
1 / 10बॉलिवूडमध्ये कतरिना कैफने आपली वेगळी भक्कम जागा निर्माण केली आहे. तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. १७ वर्षाआधी २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊस ठेवल्यावर कतरिनाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण तिने मेहनत सुरूच ठेवली. आज ती बॉलिवूड A लिस्टेड अभिनेत्री आहे. कतरिनाच्या पर्सनल लाइफबाबत तर सर्वांनाच माहीत आहे. पण तिच्या परिवारातील सदस्यांबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. चला जाणून घेऊ काय करतात कतरिनाने आठ भाऊ-बहिणी.....2 / 10सर्वातआधी जाणून घ्या कतरिनाची आई काय करते. तर कतरिनाची आई Suzzane Turquotte ही एक सोशल वर्कर आहे. तिने तिचं आयुष्य लोकांचं भलं करण्यात घालवलं. आजही ती सोशल वर्क करते. तिने भारतातीलही अनेक चॅरिटी प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतला आहे.3 / 10Stephanie Turquotte - कतरिनाची सर्वात मोठी आहे स्टीफनी. ती सर्व भाऊ-बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. कतरिनाच्या बालपणीच्या फोटोत स्टीफनीला बघता येतं. ती कॅमेरापासून दूर राहणं पसंत करते. स्टीफनी आपल्या परिवारासोबत प्रायव्हेट लाइफ जगते.4 / 10Micheal उर्फ Sebastien Turquotte - कतरिनाचा एकुलता एक भाऊ मायकल दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तो एक फर्निचर डिझायनर आहे. त्याचा त्याच्या कामासंबंधी एक ब्लॉगही आहे. मायकलला फिरण्याची आवड आहे. तसेच तो एक प्रोफेशनल Skier आहे.5 / 10Christine Turquotte - क्रिस्टीनही कतरिनाची तिसऱ्या नंबरची बहीण आहे. तिचं लग्न झालं असून ती होममेकर आहे. ती सुद्धा मीडिया आणि कॅमेरापासून दूर राहणं पसतं करते.6 / 10Natacha Turquotte - कतरिनाची चौथी बहीण आहे नताशा. नताशा फारच टॅलेंटेड असून ती एक ज्वेलरी डिझायनर आहे. कतरिनाने तिच्या बहिणीने डिझाइन केलेली ज्वेलरी अनेकदा वापरली आहे.7 / 10Melissa Turquotte - पाचव्या नंबरवर आहे कतरिना. त्यानंतर सहाव्या नंबरवर आहे तिची बहीण मेलिशा. मेलिशा शिक्षणाच्या बाबतीत फार हुशार आहे. ती एक मॅथमॅटेशिअन आणि स्कॉलर आहे. 8 / 10रिपोर्ट्सनुसार, मेलिशाने २००९ मध्ये इंपेरिअल कॉलेजमध्ये प्रतिष्ठित Laing O Rourke Mathematics Award जिंकला होता. तिने डायनामिक्स नेटवर्कमध्ये Anomaly Detection थेसीसवर DSI बेस्ट थेसीस प्राइजही जिंकलं होतं.9 / 10Isabelle Kaif - सातव्या नंबरवर कतरिनाही सर्वात लहान बहीण इसाबेल कैफ. ती एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये इसाबेलने टाइम टू डान्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. 10 / 10Soniya Turquotte - कतरिनाची सर्वात लहान बहीण आहे सोनिया. सोनिया एक फोटोग्राफर आणि ग्राफीक डिझायनर आहे. कतरिनाचं तिच्या सर्वच भाऊ-बहिणींसोबत खास बॉन्डींग आहे.