सलमानबद्दल कॅटरिनाचा अनुभव धमाकेदार असाच राहिला. कॅटरिनाच्या मते, सलमान खान धमाकेदार व्यक्ति आहे. ज्यांना सलमानसारखे बनायचे आहे, त्या सगळ्यांसाठी तो रोल मॉडेल आहे. तो काय विचार करतोय, याचा अंदाजच तुम्हाला येत नाही. त्याचे हे मौन आणि त्याच्यातील आत्मविश्वास या दोन गोष्टी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात.
शाहरूखबद्दलही कॅटरिना बोलली. शाहरूख खान अतिशय बुद्धिमान व समजदार व्यक्ति आहे. तो अद्भूत बोलतो. त्याच्या प्रत्येक शब्दातून त्याचे ज्ञान झळकते. त्याच्यात खूप ऊर्जा आहे. त्याच्या या ऊर्जेला तुम्ही थांबवूच श्कत नाही, असे कॅटरिना म्हणाली.
आता उरला आमिर खान. तर कॅटरिनाच्या मते, आमिर खान कामाप्रति कमालीचा प्रामाणिक आहे. त्याच्याइतक्या निष्ठेने काम करणारा दुसरा कुठलाही अभिनेता नाही. तो त्याची बुद्धी, मन आणि शरिराने काम करतो.
ALSO READ : कॅटरिना कैफचा इन्स्टाग्राम डेब्यू ठरला दीपिका पादुकोणच्या नाराजीचे कारण?
कॅटरिनाने अलीकडे इन्स्टाग्रामवर डेब्यू केले. सध्या कॅटरिना ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात बिझी आहे. यात ती सलमान खानच्या अपोझिट दिसणार आहे. लवकरच तिचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात कॅटरिना तिचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर याच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.