ALSO READ : छोट्या तैमूर अली खानचा हा नवाबी थाट तुम्ही पाहिलातं?
करिनाने अगदी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एका वेडिंग मॅगझिनसाठी फोटोशूट केले. यात करिना इतकी सुंदर दिसतेय की, तुम्ही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडाल. पाकिस्तानी डिझाईनरने डिझाईन केलेल्या ड्रेसमधील तिचा रॉयल लूक शानदार आहे. तिचा ब्राईडल अवतारही तितकाच शानदार आहे.
करिनाचे प्रेग्नेंसीदरम्यान १८ किलो वजन वाढले होते. त्यामुळे एवढ्या कमी वेळात बारा किलो वजन कमी करणे,नक्कीच सोपे नव्हते. पण करिनाने अगदी निष्ठेने आणि तेवढ्याच सुनियोजितपणे वजन कमी केले. सुरुवातीला तिने यासाठी योगाचा आधार घेतला होता. पुढे तिने एक्सरसाइज करण्यास सुरुवात केली. शिवाय डायटीशियन रुजुता दिवेकर हिने दिलेला डायट चार्टही ती नियमितपणे फॉलो करत होती.
करिना लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकता कपूर आणि रेहा कपूर एकत्र प्रोड्यूस करणार आहेत. करिना लवकरच तिचा बेस्ट फ्रेण्ड करण जोहर याच्यासोबत एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार असल्याचीही खबर आहे.