Join us

‘ड्रीम टीम टूर’ मध्ये करण-कॅटचे ‘शावा शावा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 10:32 IST

 सध्या ‘बी टाऊन’ मधील कलाकारांमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ ची हवा आहे.लाईव्ह शो साठी सर्वांनीच खुप तयारी केली होती. विविध ...

 सध्या ‘बी टाऊन’ मधील कलाकारांमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ ची हवा आहे.लाईव्ह शो साठी सर्वांनीच खुप तयारी केली होती. विविध गाण्यांवर त्यांचे डान्सप्रकार त्यांनी रिहर्सलमध्ये ठरवले होते. सातत्याने ते सोशल मीडियावर त्यांची तयारीचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होते. तसेच ते ह्युस्टनला पोहोचल्यानंतर फोटो अपडेट करणे सुरूच होते.यात करण जोहर, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर यांचा समावेश आहे. या सोहळ्यात करण-कॅटरिनाने ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘शावा शावा’ गाण्यावर एकत्र डान्स केला.त्यानंतर त्या दोघांनी ‘ड्रीम टीम’ला जॉईन केले. ‘शावा शावा’ नंतर इतर कलाकारांचे परफॉर्मन्सेस सादर झाले. इतर कलाप्रकारही अतिशय नयनरम्य होते.