तिच्या या आऊटफिटमध्ये सगळ्यात वेगळे काय होते तर तिचे स्टाईलिश ब्लॅकलेस टॉप. या ब्लॅकलेस टॉपवर मोकळे केस, फुटविअरमध्ये ब्लॅक कलर हाय हिल्स सँडल, क्लचसोबत स्लिंग चेन आणि हलकाचा मेकअप अशा अतिशय साध्या पण सुंदर स्टाईलमध्ये करिना या पार्टीत आली. निश्चितपणे करिनाने या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
तैमूरच्या जन्मानंतर आता करिनाने कामावर परतण्याची तयारी चालवली आहे. प्रेग्नंसीदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यावर तिचा भर आहे. यासाठी योगा, जिम असे सगळे करिना सध्या करतेय. अगदी अलीकडे करिनाचे योगा क्लासनंतरचे काही फोटो व्हायरल झाले होते. लवकरच करिना ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमात परतणार आहे. त्याचमुळे प्रेग्नंसीनंतर आपले फिगर परत मिळवण्यासाठी करिना धडपडते आहे. अर्थातसोबतच तैमूरच्या संगोपनातही ती बिझी आहे. त्याची कुठलीही गैरसोय होणार नाही, त्याला पूर्ण वेळ मिळावा, याबद्दलही ती आग्रही आहे.