कामसूत्रच्या ‘फेमस’ जाहिराती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 20:47 IST
कामसूत्र या कंडोम निर्मिती कंपनीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या २५ वर्षांच्या काळात अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या ...
कामसूत्रच्या ‘फेमस’ जाहिराती
कामसूत्र या कंडोम निर्मिती कंपनीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या २५ वर्षांच्या काळात अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या गाजल्याही खूप. २५ वर्षापूर्वी पूजा बेदी आणि मार्क रॉबिनसन यांनी केलेल्या जाहिरातीने खळबळ माजली. नव्वदीच्या दशकात कंडोमबाबत इतक्या खुलेआमपणे बोलणे म्हणजे पापच. १९९१ साली रेमंड कंपनीने कामसूत्र या ब्रँडचा प्रारंभ केला. २५ वर्षांपूर्वी कामसूत्रच्या जाहिरातीने पूजा बेदी आणि मार्क रॉबिनसन्स हे घराघरात पोहोचले. त्या काळी या दोघांनाही अगदी गौरवान्वित केल्याचा भास व्हायचा. आजही ज्यावेळी ते या केलेल्या जाहिरातींकडे पाहतात, त्यावेळी त्यांना नक्कीच आनंद वाटतो. जो जिता वोही सिकंदर या चित्रपटातून सेक्स सिम्बॉल म्हणून पूजा बेदी पुढे आली होती. या कामसूत्रच्या जाहिरातीची ही सुरुवातीला अगदी मजेशीर कथा आहे. गोव्यात ज्यावेळी या जाहिरातीचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी पूजाला सांगण्यात आले होते, की ती शॉवर घेत असेल आणि मार्क हा बोटीतून येईल. पण ज्यावेळी शॉवरखाली अंघोळ करताना तिने मार्क तिथे आलेला पाहिले, त्यावेळी तिला आश्चर्य वाटले! तिने विचारले हा इथे काय करतोय, त्यावेळी तिला सांगण्यात आले की, तुझ्याबरोबर त्याला देखील शॉवर घेताना दाखविण्यात येणार आहे. पूजाला त्याचे फारसे काही वाटले नाही. थोड्या वेळाने तिला सांगण्यात आले की, मार्कच्या पाठीमागून दाबायचे आहे. त्याला पूजाने नकार दिला. माझ्याकडून हे होणार नाही, असे तिने सांगितले. जाहिरातीत एक जण मार्कच्या पाठीमागून हाताने दाबताना दिसतो, पण तो हात पूजाचा नाही. तर मेकअप आर्टिस्टचा आहे. या जाहिरातीने खूप धुमाकूळ माजविला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. अनेक कंडोम कंपन्यांसाठी बॉलीवूड स्टार्सनी जाहिराती केल्या. कामसूत्र या कंपनीने अनेक जाहिराती केल्या. त्यातील बºयाचशा गाजल्या.