सलमानबरोबर काम करताना मीडियामध्ये प्रसिद्ध असलेला शेरा ऊर्फ गुरुमितसिंग जॉली याने सलमानला त्याच्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात साथ दिलेली आहे. त्यामुळे सलमानही त्याच्यावर चांगलाच मेहेरबान झालेला आहे. बिझनेस आॅफ सिनेमा या वेबसाइटनुसार सलमान शेराला महिन्याकाठी १५ लाख रुपये पगार देतो. म्हणजेच वर्षभराचे त्याला तब्बल २ कोटी रुपये पॅकेज आहे. सलमान शेराला एवढे तगडे पॅकेज दिले जात असल्याने तो नेहमीच सलमानला टाइट सिक्युरिटी देत असतो.
खरं तर सलमान खानसोबत काम करणे सोपे नाही. कारण सलमानचे फॅन्स त्याची एक झलक बघण्यासाठी अक्षरश: उतावीळ असतात. एकदा तर शेरा सलमानच्या सिक्युरिटीसाठी तब्बल आठ किलोमीटर पायी चालला होता. त्याचे झाले असे की, एका इव्हेंटसाठी गेलेल्या सलमानची कार त्याच्या फॅन्सने घेरली होती. सलमानचे फॅन्स कारला अजिबात पुढे जाऊ देत नव्हते. अशात शेराने कारच्या खाली उतरून तब्बल ८ किलोमीटर पायी चालून रस्ता क्लिअर केला होता. शेराची हीच इमानदारी सलमानला भावणारी असल्याने त्याने अद्यापपर्यंत शेराची साथ सोडलेली नाही.
वास्तविक सलमान शेराला त्याच्या फॅमिली सदस्याप्रमाणे समजतो. सलमानशी शेराची भेट १९९५ मध्ये झाली होती. चंदीगड येथील एका इव्हेंटमध्ये जेव्हा फॅन्सनी सलमान खानला घेरले होते, तेव्हा सलमानचा भाऊ सोहेल खानने शेराला सलमानच्या सिक्युरिटीची जबाबदारी सोपविली होती. शिवाय शेराही सलमानप्रती प्रचंड प्रामाणिक असल्याने सलमान त्याला नेहमी सोबत ठेवत असतो. जेव्हा करिना कपूर बरोबर सलमानने ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट केला होता, तेव्हा सलमानने त्यास शेराच्या लाइफला डेडिकेट केले होते. या चित्रपटाच्या एका गाण्यात शेराचीही झलक बघावयास मिळाली होती.