श्रद्धा कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने तिने चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस इन्स्टाग्रामवर सेल्फीसह पोस्ट केला आहे. रॅपअप नंतरचे चित्रपटाच्या टीमचे सेलिब्रेशनचे काही फोटोही व्हारयल झाले आहेत. संपूर्ण टीमसोबत केक कटिंग, सेल्फी अशा सेलिब्रेशनमध्ये शूटिंग संपवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला ‘ओके जानू’ चित्रपटातील आदित्य-श्रद्धा यांच्या सेल्फीला चाहत्यांचे प्रचंड लाईक्स मिळत आहेत. अद्याप चित्रपटाचा टीझर देखील आऊट करण्यात आलेला नाहीये.
शाद अली यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट्यच असे आहे की, त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून फोटो, व्हिडीओ यांच्या संदर्भात गोपनियता पाळली आहे. त्यामुळे आदित्य-श्रद्धा यांच्या चाहत्यांना चित्रपटाचे कथानक, गाणी, प्लॉट यांच्यासंदर्भात कमालीची उत्सुकता लागल्याचे जाणवतेय.