चैतन्य व समन्था यांची पहिली भेट गौतम वासुदेव मेनन यांच्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटादरम्यान झाली होती. ‘ये माया चेसावे’ हा एक रोमॅन्टिक चित्रपट होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम बहरले. यानंतर ‘आॅटोनगर सूर्या’ आणि ‘मनम’ यासारख्या चित्रपटांत चैतन्य व समन्था हे दोघे एकत्र दिसले. गतवर्षी चैतन्य व समन्था या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मात्र आम्ही दोघे केवळ चांगले मित्र आहोत, असे सांगून समन्थाने या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. सिनेसृष्टीत माझा सर्वांत जवळचा आणि चांगला मित्र कोण असेल तर तो चैतन्य आहे, असे ती म्हणाली होती. अर्थात हाच चांगला मित्रचं समन्थाचा ‘जीवनसाथी’ होणार आहे, हे मात्र तिने दडवून ठेवले होते.
नागा चैतन्य हा सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन याचा मोठा मुलगा आहे. सध्या नागा चैतन्य हा दिग्दर्शक कल्याण कृष्ण यांच्या तेलगू चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. नागार्जुन हा आपला मुलगा नागा चैतन्यसोबत लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. अर्थात या सर्व अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. खुद्द नागार्जुनने टिष्ट्वटरवर याचा खुलासा केला होता. मी व नागा चैतन्य एकत्र काम करणार असल्याची बातमी माझ्या कानावर आली. माझ्यासाठीही ही मोठी बातमी होती, असे त्याने स्पष्ट केले होते. नागार्जुन व नागा चैतन्य ही बाप लेकाची जोडी सन २०१४ मध्ये आलेल्या ‘मनम’मध्ये दिसली होती.
ALSO READ : रजनीकांतसोबत काम करण्यास कमल हासन राजी; पण?
Exclusive गश्मिर महाजनी साकारणार नागार्जुन