वैयक्तिक आयुष्याविषयी कमालीची गोपनीयता बाळगणाºया लिसाने गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात दीर्घकाळपासूनचा बॉयफ्रेंड डिनो लालवानीशी विवाह केला होता.
‘ऐ दिल है मुश्किल’नंतर लीजाकडे अनेक सिनेमांचे प्रस्ताव आलेत. पण तिने एकापाठोपाठ एक ते सगळे प्रस्ताव नाकारले. यानंतर तिच्या आई होण्याची कुणकुणच इंडस्ट्रीमध्ये लागली. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये लिसा अखेरची दिसली होती. यात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि फवाद खान आदी मुख्य भूमिकेत होते.
मुळात लिजाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. आता ती अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे. लिसाने गतवर्षी आक्टोबरमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड डिनो ललवानी याच्याशी लग्न केले होते. डिनो हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. चेन्नईत जन्मलेली लिसा बरीच वर्षे विदेशात राहिलीय. आधी आॅस्ट्रेलिया, मग अमेरिकेत ती राहिली. यानंतर अभिनेत्री बनण्यासाठी तिने मुंबई गाठली. बॉलिवूडमध्ये ती ‘आयशा’,‘क्वीन’, ‘हाऊसफुल3’ अशा अनेक सिनेमांत दिसली.
चेन्नईमध्ये जन्मलेल्य लिसाचे बालपण विदेशात गेले. कंगना राणौतच्या ‘क्वीन’मधील भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती.