अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसोबत आनंद महाराज.
उत्तराखंड येथे विराट आणि अनुष्का हे कपल त्यांच्या फॅमिलीसहित नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. उत्तराखंडला गेल्यापासूनच माध्यमांना ते साखरपुडा करणार असल्याची उडती खबर मिळाली. मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या साखरपुड्याला येणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. दरम्यान, अमिताभ बच्चन डेहराडून एअरपोर्टवर माध्यमांना दिसले. तेव्हापासूनच माध्यमांचा संशय बळावला आणि मग त्यांनी त्यांची पाठ काही सोडली नाही.
हरिद्वार येथे महादेवाची पुजा करताना अनुष्का.
सुत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या साखरपुड्याबद्दलच्या सर्व बातम्या या खोट्या होत्या. आमच्या माहितीनुसार तरी साखरपुड्याचा त्यांचा काही प्लॅन नाही. ‘त्या’ दोघांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती आम्हाला कळालेला नाही.’
डेहराडून एअरपोर्टवर मेगास्टार अमिताभ बच्चन यांंना माध्यमांनी असा गराडा घातला.