Join us  

PICS : आज की पार्टी लोलो की तरफ से...! करिश्मा कपूरच्या डिनर पार्टीत करिना, मलायकाची धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 11:22 AM

1 / 10
बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीची एकही संधी सोडत नाहीत. करण जोहर गँग तर अजिबात नाही. काल अशीच एक पार्टी रंगली आणि या गँगनं धम्माल पार्टी केली.
2 / 10
होय, करिश्मा कपूरनं काल खास डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सगळी गँग एकत्र जमली. या पार्टीचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
3 / 10
करिना कपूर या पार्टीला असणारचं. तिने बहिणीच्या पार्टीला अशी स्टाइलिश एन्ट्री घेतली. मल्टीकलर्ड काफ्तानमध्ये स्टनिंग करिनाने पापाराझींना मस्तपैकी पोझ दिल्यात.
4 / 10
मलायका अरोरा ही या गँगची सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. मलायका कारमधून उतरताच पापाराझींनी तिला घेराव घातला. नेहमीप्रमाणे मलायकाचा लुक हटके ठरला.
5 / 10
करण जोहरशिवाय पार्टी होणारच कशी? पार्टीची जान असलेला करण नेहमीसारख्या हटके लुकमध्ये करिश्माच्या या पार्टीला पोहोचला. त्यानेही कॅमेऱ्याला पोझ दिल्यात.
6 / 10
या पार्टीचे काही फोटो मनीष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात सगळे धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. करिश्मा व करिनासोबत त्याची ही सेल्फी पाहाच.
7 / 10
करण व मनीष मल्होत्रा दोघंही जिगरी यार आहेत. पार्टीच्या निमित्ताने मग सेल्फी तर बनतोच. मनीषने करणसोबतचा सेल्फीही शेअर केला आहे.
8 / 10
संजय कपूची पत्नी महिप कपूर ही सुद्धा पार्टीत होती. तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह मनीष मल्होत्राला आवरता आला नाही.
9 / 10
मलायका अरोरा पार्टीला होती. शिवाय तिची बहिण अमृता अरोराही पार्टीला हजर होती. या दोघींसोबत मनीषने अशी मस्त सेल्फी घेतली.
10 / 10
ही सेल्फी सगळ्यात खास आहे. यात मनीष करिना व संजय कपूर यांच्यासोबत दिसतोय. पार्टीत सर्वांनी किती धम्माल केली, याचा अंदाज तुम्हाला या फोटोंवरून येईलच.
टॅग्स :करिश्मा कपूरकरिना कपूरमलायका अरोराकरण जोहरमनीष मल्होत्रा