Join us

या पाकिस्तानी कलाकारांना भारताने केले मोठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 20:00 IST

पाकिस्तानमध्ये कलाकारांना पैसा, प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळत नसल्याने ते बॉलिवुडकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीकडे आपल्या इंडस्ट्रीच्या तुलनेत ...

पाकिस्तानमध्ये कलाकारांना पैसा, प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळत नसल्याने ते बॉलिवुडकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीकडे आपल्या इंडस्ट्रीच्या तुलनेत खूपच कमी पैसा आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलावंतांना पाकिस्तानापेक्षा भारतात अधिक यश मिळते. पाकिस्तानी अभिनेते भारतीय चित्रपटात काम करण्याची सुरुवात सत्तरच्या दशकात झाली. सत्तरच्या दशकात पाकिस्तानी कलाकार आणि भारतीय कलाकारांचे नाते खूप चांगले होते. शत्रुघ्न सिन्हा, दिलीप कुमार यांसारखे अभिनेते अनेकवेळा पाकिस्तानमध्ये जात असत. ऐंशीच्या दशकापर्यंत पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवुडमध्ये काम करण्याचे प्रमाण वाढले होते. कलाकार हे शांतीदूत असल्याचेच त्यावेळी म्हटले जात होते.बॉलिवुडमध्ये काम केलेले पाकिस्तानी कलाकार ःसलमा आगा सलमा आगाने निकाह या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सलमाने या चित्रपटात गाणीदेखील गायली होती. या गाण्यांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. सलमा आगाचे कुटुंब हे पाकिस्तानचे असले तरी तिचा जन्म आणि बालपण लंडनमध्ये गेले. ऐंशीच्या दशकात सलमाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर तिने पाकिस्तानमध्ये एक अभिनेत्री, गायिका म्हणून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.नदीम नदीमला पाकिस्तानचा सुपरस्टार मानले जाते. नदीम भारतीय चित्रपटात काम करणारा पहिला पाकिस्तानी आहे. 1986 साली आलेल्या दूर देश या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात राज बब्बर प्रमुख भूमिकेत होता. नदीमच्या आधी सलमाने भारतीय चित्रपटात काम केले असले तरी ती ब्रिटिश नागरिक असल्याने नदीम हाच बॉलिवुडमध्ये काम केलेला पहिला पाकिस्तानी अभिनेेता मानला जातो. मोहोम्मद अली आणि झेबापाकिस्तानी चित्रपटातील प्रसिद्ध जोडी मोहोम्मद अली आणि झेबा यांनी क्लर्क या बॉलिवुडच्या चित्रपटात काम केले होते. मोहोम्मदचे अनेक बॉलिवुडच्या कलाकारांसोबत चांगले संबंध होते. लाहोरला गेल्यानंतर अनेक भारतीय कलाकार त्याच्याच घरी राहात असत. मनोज कुमार यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे त्याने हिंदी चित्रपटात काम करण्याचे ठरवले. या चित्रपटात रेखा, मनोज कुमार, अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मोहोम्मद आणि झेबाला या चित्रपटात खूपच छोटी भूमिका वाट्याला आल्याने त्यांची निराशा झाली होती. तलत हुसैनतलत हुसैनने अनेक पाकिस्तानी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरचे एक मोठे नाव अशी तलतची पाकिस्तानमध्ये ओळख आहे. तलतने सौतन की बेटी या 1989ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारली होती. झेबा बख्तियारझेबाने हिना या आरके फिल्मसच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. झेबा अनारकली या पाकिस्तानच्या मालिकेत झळकली होती. या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेनंतरच हिंदी चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली. मोहसिन खानमोहसिन हा क्रिकेटर असला तरी त्याने अनेक चित्रपटात अभिनयही केला आहे. बटवारा हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्याने रिना रॉयशी लग्न केले होते. रिनाशी घटस्फोट घेतल्यानंतर तो पाकिस्तानात परतला आणि तेथील अनेक चित्रपटांत त्याने काम केले. सोमी अलीसोमीचा जन्म पाकिस्तान झाला असला तरी तिचे बालपण अमेरिकेत गेले. सोमीने काही हिंदी चित्रपटात काम केले. सलमान खानसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे तिचे नाव अधिक चर्चेत राहिले.मीरा2005साली प्रदर्शित झालेल्या नजर या चित्रपटात मीराने काम केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.वीणा मलिकबिग बॉसमध्ये झळकलेली वीणा मलिक तिच्या वागण्यामुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहिली. अली जाफरतेरे बिन लादेन या चित्रपटात झळकलेला अली पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. अलीने बॉलिवुडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. फवाद खानफवादने खुबसुरत या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये आगमन केले. दिल ए मुश्किल या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. महिरा खानमहिराने पाकिस्तानच्या अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. आता ती रईस या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणार आहे.