सलमान खान
‘दबंग’ हा चित्रपट रिलीज झाला अन् सलमान खानचा मर्दानी अवतार प्रेक्षकांना घायाळ करून गेला. पिळदार मिशीतील सलमानला प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले. शिवाय त्याला ‘दबंग’ ही बिरुदावलीही मिळवून दिली. सलमानने याच इमेजमधील चित्रपट करावेत, असा काहीसा सूचक सल्ला त्याला त्याच्या चाहत्यांनी दिला. मात्र ‘ट्यूबलाइट’मध्ये त्याने इमेज बदलण्याचा प्रयत्न केला; अन् त्याचा त्याला फटकाही बसला. परंतु ‘आयफा’मध्ये तो पुन्हा एकदा डॅशिंग अवतारात परतल्याचे दिसून आले. सलमानचा दाढी-मिशीवाला लुक खूपच पसंत केला. शिवाय यावर चर्चाही रंगली.
शाहिद कपूर
अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो राजा रतन सिंगची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने भारदस्त दाढी आणि पिळदार मिशा वाढविल्या आहेत. ‘आयफा’मध्ये जेव्हा तो त्याच्या परिवारासमवेत पोहोचला तेव्हा त्याचा हाच लुक बघावयास मिळाला. या लुकमध्ये शाहिद खूपच सुुंदर दिसत होता. शाहिदचा हा लुक चर्चेचा विषय ठरला.
सुनील शेट्टी
‘अण्णा’ या नावाने ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी यानेदेखील अशाच काहीशा मर्दानी अंदाजात आयफामध्ये हजेरी लावली होती. या लुकमध्ये सुनील खूपच डॅशिंग दिसत होता. जेव्हा त्याने ग्रीन कार्पेटवर अवतरला तेव्हा एकच कल्लोळ करण्यात आला. अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची एंट्री खूपच आकर्षक ठरली.
सैफ अली खान
नवाब सैफ अली खानचा आयफातील लुक चांगलाच चर्चिला गेला. पिळदार मिशांमध्ये सैफने ग्रीन कार्पेटवर केलेली एंट्री सगळ्यांचेच लक्ष आकर्षित करणारी ठरली. या लुकमध्ये सैफ खºया अर्थाने नवाब दिसत होता. अनेकांनी त्याच्या या लुकचे कौतुकही केले. सैफदेखील त्याच्या या लुकवर खूश असल्याचे दिसून आले.
अनिल कपूर
अभिनेता अनिल कपूर आजही बॉलिवूडमध्ये स्वत:ची छाप पाडून आहे. कारण पूर्वी जसा त्याचा लुक होता, तसाच काहीसा लुक आजही आहे. उलट आता तो दाढी-मिशीच्या लुकमध्ये अधिक प्रभावी आणि डॅशिंग दिसतो. आयफामध्ये त्याचा हा लुक खूप पसंत केला गेला.