आयफाच्या तिसºया दिवशी म्हणजेच शनिवारी मेटलाइफ स्टेडियममध्ये अवॉर्ड्स समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. अशात दुसºयाच दिवशी सेलेब्सनी दाखविलेला जलवा आकर्षणाचा विषय ठरला. प्रत्येक सेलेब्सचा अंदाज बघण्यासारखा होता. काहींनी पारंपरिक तर काही वेस्टर्न पोशाख परिधान करून आपल्या सौंदर्याने उपस्थितांना घायाळ केले.
१६ जुलै रोजी आयफा क्लोजिंग पार्टी होणार असून, यामध्ये बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सेलेब्स बघावयास मिळू शकतात. सध्या न्यू यॉर्क शहर आयफाच्या रंगात रंगले असून, बॉलिवूडकरांनी आपल्या छाप पाडल्याचे दिसून येत आहे.