उन्हाळ्यातून बचाव करणाºया ड्रेसमध्ये कॅमेºयात कैद झालेल्या रणवीरचा हा लुक त्याच्या इतर लुकप्रमाणेच अगदीच बिनधास्त होता. फोटोमध्ये तो लूज वेस्ट आणि शार्ट्स डोक्यावर पांढºया आणि लाल रंगाची कॅप घातलेला दिसत आहे. सोबतच गर्मीपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी त्याने कूल असे शेड्स घातलेले आहेत. रणवीरचा हा लुक बघून कोणीही असे म्हणेल की, तो गोव्याच्या बीचवर मस्ती करण्यासाठी जात आहे. मात्र वास्तविकता ही आहे की, रणवीरने गर्मीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ही नवी स्टाइल केली आहे.
असो, रणवीरच्या या बीयर्ड लुकविषयी बोलायचे झाल्यास तो त्याच्या आगामी चित्रपटात या लुकमध्ये बघावयास मिळणार आहे. रणवीरचा हा लुक सध्या व्हायरल झाला असून, त्याच्या फॅन्सला तो भावत आहे. त्याचबरोबर गर्मीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणता फंडा वापरावा असा जणू काही सल्लाच रणवीरने दिला आहे.