ऐश्वर्या रॉय बच्चनने ‘ऐ दिल..’ ला नकार दिला असता तर कदाचित मी हा चित्रपट बनवलाच नसता. ऐश ही भूमिका करेल की नाही? अशी मला भीती होती. लग्नानंतर अशा भूमिका करण्यापूर्वी अभिनेत्री विचार करतात. मात्र, ‘बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल’ अशा कवयित्री सबाची भूमिका करायला ऐश लगेचच तयार झाली आणि माझा जीव भांड्यात पडला, असे करण म्हणाला.
या चित्रपटात ऐश्वर्याची लहान पण अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आत्तापर्यंतच्या भूमिकांपैकी अतिशय बोल्ड आणि सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून याकडे पाहिले जात आहे. एकंदर काय तर, आराध्याच्या जन्माच्या तब्बल तीन वर्षांनंतर कमबॅक करूनही ऐशने सध्याच्या ‘ए’ ग्रेड अभिनेत्रींना मागे टाकले.