1 / 10पश्मिना रोशन या गोड चेहऱ्यानं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. ही पश्मिना कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती रोशन कुटुंबाची लेक आहे.2 / 10होय, रोशन कुटुंबातील हा हिरा बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू करण्यास तयार आहे. रोशन कुटुंबाची ही लेक राजेश रोशन यांची लेक आहे. लवकरच तिचा डेब्यू होतोय.3 / 10 हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून डेब्यू केला आणि बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. आता हृतिकच्या पाठोपाठ रोशन कुटुंबातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. तीच ती पश्मिना.4 / 10 हृतिकचे काका राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन लवकरच ‘इश्क विश्क रीबाइंड’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्या फोटोंनी सध्या सोशल मीडिया युजर्सला वेड लावलं आहे.5 / 102003 साली आलेला शाहिद कपूरचा ‘इश्क विश्क’ हा सिनेमा सुपरहिट झाला होता. यात शाहिद कपूर व अमृता राव लीड रोलमध्ये होते. आता याचा सीक्वल येतोय. यात पश्मिना, रोहित सराफ, जिब्रान खान व नैला ग्रेवाल हे चेहरे झळकणार आहेत. निपुण अविनाथ धर्माधिकारी हा सिनेमा दिग्दर्शित करतोय.6 / 10आपल्या डेब्यूसाठी पश्मिना प्रचंड उत्साहित आहे. असं वाटतंय जणू अनेक वर्षाच्या कष्टाचं फळ मिळालंय. मी स्क्रिनवर आपला पहिला अनुभव घेणार आहे. मी उत्साहित आहे, तितकीच घाबरलेली आहे, असं तिने म्हटलं आहे.7 / 10 हृतिक स्वत: आपल्या लहान चुलत बहिणीला गाईड करतोय. हृतिक व पश्मिना एकमेकांच्या क्लोज आहे. यामुळे आपल्या बहिणीला तो स्वत:ला ट्रेनिंग देतोय. ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. 8 / 10सौंदर्याच्या बाबतीत पश्मिना इतर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. सारा, जान्हवी, अनन्या यांनाही ती मात देऊ शकते. तिने बेरी जॉन अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.9 / 10पश्मिना ही रोशन कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीची सदस्य असेल. पश्मिनाने थिएटर डेब्यू केला, तेव्हा हृतिकने तिची भरभरून प्रशंसा केली होती. 10 / 10पश्मिनाचे वडिल राजेश रोशन हे हृतिकचे बाबा राकेश रोशन यांचे धाकटे बंधू आहेत. संगीतक्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. राजेश रोशन, राकेश रोशन व हृतिक रोशन या तिघांनी कहो ना प्यार है, क्रिश, क्रिश 3, काबिल अशा सिनेमात एकत्र काम केलं आहे.