यावेळी हृतिक व सुजैन या दोघांकडे बघून त्यांचा घटस्फोट झालाच नाही, असेच अनेकांना वाटले. पांढºया ड्रेसमध्ये हृतिकसोबत असलेल्या सुजैनची बॉडीलँग्वेजही अगदी कूल होती. घटस्फोटाआधी हृतिक व सुजैन एकत्र वावरत, अगदी तेवढ्याच कूल अंदाजात सुजैन यावेळी दिसली. हृतिकचा अंदाजही यापेक्षा काही वेगळा नव्हता. हृतिकच्या टी-शर्टवर वर लिहिलेले होते, ‘लव्ह’ आणि खाली लिहिलेले होते ‘पीस’.
हृतिक स्वत: गाडी चालवत रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. सुजैन आणि त्यांची दोन्ही मुले यावेळी त्याच्यासोबत होती. हृतिकचे वडील राकेश रोशनही पत्नीसोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेत. शिवाय हृतिकचे काका राजेश रोशन व त्यांचे कुटुंबही यावेळी दिसले.
अगदी महिनाभरापूर्वी हृतिक व सुजैन यांनी डिनर डेट एन्जॉय केली होती. यानंतर हृतिक व सुजैन दोघांनी दुबईमध्ये मुलांसोबत न्यू ईयर सेलिब्रेशन केले होते. दुबईच्या रस्त्यांवरचे या सर्वांचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये हृतिक व सुजैन दोघांचे बॉन्डिंग पुन्हा एकदा घट्ट झाल्याचे स्पष्टपणे दिसले. एकंदर काय तर हृतिक व सुजैन दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसू लागले आहे. तुमच्या-आमच्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली बरे असू शकेल?