एकही चित्रपट न करता राखी सावंत आहे कोटयाधीश; पाहा नेमका कसा कमवते पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 15:16 IST
1 / 11आपल्या अतरंगी स्टाइल आणि वायफळ बडबड यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत.2 / 11नीरु भेडा हे खरं नाव बदलून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी राखी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. 3 / 11अग्नीचक्र या चित्रपटातून राखीने सिनेसृष्टीत पदार्पण केल्याचं म्हटलं जातं. मात्र, या नंतर ही कोणत्याही चित्रपटात अभिनेत्री म्हणून फारशी झळकली नाही.4 / 11सध्याच्या घडीला राखी कोणत्याही चित्रपट वा जाहिरातींमध्ये दिसत नाही. मात्र, तरीदेखील ती कोटयावधींची मालकीण असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच ती इतकी कमाई कशी करते पाहुयात.5 / 11राखी खासकरुन तिच्या आयटम साँगसाठी ओळखली जाते.6 / 11राखीच्या नावावर एकूण ३७ कोटी रुपयांच्या संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, तिच्याकडे हा पैसा कुठून येतो हा प्रश्न अनेकांना पडतो.7 / 11राखी सावंतचे मुंबईत दोन मोठे आलिशान फ्लॅट आहेत. तसंच तिच्याकडे कारदेखील आहे. इतंकच नाही तर तिचा एक ११ कोटींचा बंगलादेखील आहे.8 / 11राखी सावंत चित्रपटात काम करत नसली तरीदेखील ती स्टेज शो वगैरे करत असते. त्यातून तिचं घर चालतं.9 / 11राखीने आतापर्यंत अनेक स्टेज शो, बिग बॉस असे रिअॅलिटी शो केले आहेत. तसंच ती वेगवेगळे डान्सचे स्टेज शोदेखील करते.10 / 11राखीने विदेशातही डान्सचे कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे रिअॅलिटी शो,डान्स हे तिच्या उत्पन्नाचं मुख्य साधन मानलं जातं.11 / 11राखीला जोरू का गुलाम, जिस देश में गंगा रहा है, ये रास्ते में अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मात्र, परदेसीयाँ या गाण्यातून ती विशेष लोकप्रिय झाली.