‘फोर्स २’ आणि ‘अकिरा’ या अॅक्शनपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हिने अॅक्शन अवतारात भूमिका साकारली होती. तिने या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. पण, एकीकडे चित्रपटात अॅक्शन लुकमध्ये दिसलेली सोना या अलीकडेच झालेल्या फॅशन रॅम्पवॉकमध्ये बॉलिवूडची ‘दिवा’ दिसत होती. या रॅम्पविषयी सांगताना सोना म्हणाली,‘मला फॅशन वीक मध्ये रॅम्प करायला प्रचंड आवडतं. कारण हेच ते स्टेज आहे जिथून मी सुरूवात केली होती. मी शोस्टॉपर होते आणि मोनिशा सारख्या डिझायनरच्या कॉस्च्युमसाठी मला रॅम्प करायला मिळाले याचा आनंद होतोय.’
Also Read :
* सोनाक्षी सिन्हा का करतेय मुंबई भ्रमंती?
* घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी सिन्हा करणार का साखरपुडा?