वास्तविक कृष्णाने अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये एण्ट्री केलेली नाही. अशातही तिच्या फॉलोअर्सची संख्या बघण्यासारखी आहे. कारण कृष्णा इंटरनेटवर नेहमीच झळकत असते. यावेळेस पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड कारनामा करून पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वळविले आहे. या फोटोंमध्ये कृष्णा बिकिनीमध्ये बघावयास मिळत असून, इंटरनेटवर या फोटोंनी धूम उडवून दिली आहे. कृष्णाने यातील बरेचसे फोटो बाली हॉटेलमध्ये क्लीक केले आहेत. सध्या कृष्णा याठिकाणी सुट्या एन्जॉय करीत आहे.
फोटोंमध्ये कृष्णाने काळ्या रंगाची बिकिनी घातलेली असून, त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. टायगरप्रमाणेच कृष्णादेखील लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णाने सेमी न्यूड पोज देऊन धूम उडवून दिली होती. कृष्णाच्या या बिनधास्त स्वभावावर बॉलिवूडमधील अनेक निर्माते सध्या खूश आहेत. त्यामुळे कृष्णा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे.
वास्तविक कृष्णा इतर स्टार किड्सपेक्षा अगदीच वेगळी आहे. कारण बरेचसे असे स्टार किड्स आहेत, जे स्वत:ची पर्सनल लाइफ मीडियापासून दूर ठेवतात. परंतु कृष्णाची पर्सनल लाइफ कधीच मीडियापासून लपून राहिली नाही. ती नेहमीच बॉयफ्रेण्ड स्पेंसर जॉनसन याच्यासोबतचे बोल्ड फोटोज् तिच्या अकाउंटवरून शेअर करीत असते. कदाचित कृष्णाचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना पसंत येत असावा.