यावेळी तिने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ती रेड कार्पेट क्वीन का आहे. तिने परिधान केलेल्या कस्टम-मेड राल्फ लॉरेन गाऊनमध्ये तिचे सौंदर्य असे काही खुलून दिसत होते की, सर्वजण पाहतच राहिले.
सर्व मीडिया फोटोग्राफर्स तिची एकूण एक अदा आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी धडपड करीत होते. हॉलीवूडमध्ये नवखी असूनही तिला मिळत असलेला प्रतिसाद पाहता दीपिकाने अमेरिका जिंकली असेच म्हणावे लागेल.
गुलाबी रंगाचा हा गाऊन तिच्या त्वचेच्या टोनशी एकमद जुळत होता. सोबत पातळ अशी पोनी टेल आणि कानातील डार्क रेड रंगाच्याआकर्षक रिंग्समुळे तर लावाण्यवती दीपिका या प्रीमियर सोहळ्याची केंद्रबिंदू ठरली.
मुंबईतील प्रीमियरमधील गोल्डन गाऊन व लंडन प्रीमियरमधील लाल रंगाच्या गाऊननंतर लॉस एंजिलिसच्या प्रीमियरमधील तिची ड्रेसची निवड पाहता दीपिकाचा फॅशन सेन्सला काही तोडच नाही असे दिसतेय. मुंबईत घातलेल्या ड्रेसमध्ये ती जरा ‘अनकम्फर्टेबल’ वाटत होती मात्र ‘एलए’मध्ये तिला असा प्रॉब्लेम जाणवला नाही.
फोटोग्राफर्सना पोझ देण्याबरोबरच चाहत्यांना आॅटोग्राफ्स देऊन तिने खुश केले. रेड कार्पेटवरील तिचा आत्मविश्वासाने भरलेला वावर पाहून तुम्हीदेखील हैराण होऊन जाल.
चित्रपटातील सहकलाकार अॅड्रियाना ग्युटिएरेझसोबत तिने अशी खोडकर पोझ दिली.