Join us

हनीप्रीत बनलेल्या राखी सावंतसोबत बाबाने लावले ठुमके, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST

बलात्कारी बाबा राम रहीमचे वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाचे कास्टिंग पूर्ण झाले असून, राम रहीमच्या भूमिकेत संजय नेगी तर हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच शूट करण्यात आले असून, त्यात राखी सावंतने बाबा राम रहीमबरोबर लावलेले ठुकमे बघण्यासारखे आहेत.

बलात्कारी बाबा राम रहीमचे वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाचे कास्टिंग पूर्ण झाले असून, राम रहीमच्या भूमिकेत संजय नेगी तर हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच शूट करण्यात आले असून, त्यात राखी सावंतने बाबा राम रहीमबरोबर लावलेले ठुकमे बघण्यासारखे आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्विन राखी सावंत हिंला चर्चेत राहण्याची चांगलीच कला अवगत आहे. त्यामुळेच सध्या तिचा आॅनस्क्रिन बनलेल्या बाबा राम रहीमसोबतचा रोमान्स सर्वत्र व्हायरल होत आहे.राखी आणि संजय नेगीचे हे फोटो दिल्लीत तयार करण्यात आलेल्या एक सेटवर घेण्यात आले. फोटोमध्ये राखी हनीप्रीत बनली असून, बाबाच्या भूमिकेत संजय नेगी आहे.या गाण्याचे बोल काय आहेत, याविषयीची कुठलीही माहिती मिळाली नाही. मात्र फोटोमध्ये बाबा आणि हनीप्रीतची केमिस्ट्री चांगलीच रंगविल्याचे दिसून येत आहे.राम रहीम हनीप्रीतला मुलगी मानायचा मात्र त्याच्यावर आधारित या चित्रपटात वेगळेच स्टोरी दाखविली जाण्याची शक्यता आहे.हनीप्रीत सध्या फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. ती सापल्यास तिच्याकडून बºयाचशा गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. बाबा राम रहीम आणि हनीप्रीतमध्ये एक वेगळेच नाते असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगत आहे.