सनीचा एक नवा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो म्हणजे सनीचे नवे लूक़ होय, लवकरच सनीचा ‘भैयाजी सुपरहिट’ हा सिनेमा येतोय. यात सनी अगदी वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटात सनी केवळ अॅक्शनच नाही तर डान्स मुव्ह करतानाही दिसेल. एक दोन नाही तर पाच गाण्यांवर सनी थिरकतांना यात तुम्ही-आम्ही पाहू शकणार आहोत. अहमद खान याने ही सगळी गाणी कोरिओग्राफ केली आहेत. या चित्रपटात सनी उत्तर प्रदेशचा एक डॉन बनला आहे आणि त्याचमुळे खांद्यावर गमछा आणि मोठ्या मिशा अशा अवतारात सनी यात दिसणार आहे.
सन २०११ मध्ये ‘भैयाजी सुपरहिट’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. पण कुठल्याशा कारणावरून हा सिनेमा थंडबस्त्यात पडला होता. पण आताश: चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. अलीकडे सनीने सुमारे २०० डान्सरसोबत एका गाण्याचे शूटींग केले. या चित्रपटात अमीषा पटेल आणि प्रिती झिंटा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अमीषा एका अभिनेत्रीची भूमिका साकारते आहे तर प्रिती भैयाजीच्या पत्नीच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे.