Join us  

डिंपल कपाड़ियावरून सनी देओलला पत्नीने दिली होती 'ही' धमकी, दोघांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल...

By अमित इंगोले | Published: October 19, 2020 12:41 PM

1 / 13
आज १९ ऑक्टोबरला अभिनेता सनी देओल आपला ६४वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या सर्वात शानदार अॅक्शन हिरोंपैकी एक सनी देओलने १९८३ मध्ये 'बेताब' सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकनही मिळालं होतं.
2 / 13
त्यानंतर सनी 'अर्जुन' सिनेमात दिसला होता. या सिनेमापासूनच त्याच्यावर अॅक्शन हिरोचा टॅग लागला. नंतर सनीने 'घायल', 'डर', 'बॉर्डर', 'जिद्दी', 'गदर' यांसारखा एकापेक्षा सिनेमात दिसला. सनी देओल आपल्या सिनेमांसोबतच लव्ह लाइफमुळेही चर्चेत राहिला.
3 / 13
काही वर्षांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो डिंपल कपाडियासोबत दिसला होता. २०१७ सप्टेंबरमध्ये व्हायरल झालेला हा व्हिडीओ लंडनमधील असल्याचं सांगितलं जात होतं. या व्हिडीओत सनी आणि डिंपल एकमेकांचा हात हातात धरून दिसले होते.
4 / 13
दोघे एकमेंकाची कंपनी एन्जॉय करताना दिसले होते. हा व्हिडीओ पाहून लोक त्याचं जुनं प्रेम पुन्हा जिवंत झाल्याची चर्चा करू लागले होते. पण दोघांनी कधीही मीडियासमोर काही सांगितलं नाही. पण फोटोंमधून दोघांच्या नात्याची कहाणी दिसून येते.
5 / 13
डिंपल आणि सनी देओलने अनेक सिनेमात एकत्र काम केलं. या सुपरहिट जोडीने 'अर्जन', 'मंजिल मंजिल', 'आग का गोला', 'गुनाह' आणि 'नरसिम्हा' सारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. मात्र दोघेही विवाहीत असूनही त्यांच्या रिअल लाइफ केमिस्ट्रीची चर्चा नेहमीच होत होती.
6 / 13
१९७३ मध्ये डिंपल कपाडियाने 'बॉबी' सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. आणि त्याचवर्षी ती अभिनेता राजेश खन्नाची पत्नीही झाली होती. दरम्यान डिंपलआधी सनी देओल अमृता सिंहसोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होता.
7 / 13
पण अमृता त्याच्यापासून दूर झाली. पण डिंपलसोबत त्याचं नाव जोडलं जाऊ लागलं होतं. तेव्हाच डिंपल राजेश खन्नापासून वेगळी राहू लागली होती.
8 / 13
असे सांगितले जाते की, ११ वर्ष दोघांचं कथित अफेअर सुरू होतं. मीडियात तर अशीही चर्चा होती की, सनी देओलची पत्नी पूजाने त्याला नातं संपवण्याचीही धमकी दिली होती. असं झालं नाही तर ती दोन्ही मुलांना घेऊन घर सोडून जाईल अशीही धमकी तिने दिली होती असं बोललं जातं.
9 / 13
असे सांगितले जाते की, सनी आपल्या परिवाराच्या बाजूने उभा राहिला. असेही सांगितले जाते की, अनेक वर्षांनी सनी आणि डिंपल एकत्र बघितले गेले ते डिंपलची बहीण सिंपल वारली होती तेव्हा. त्यावेळी सनी डिंपलचं सांत्वन करताना दिसला होता.
10 / 13
11 / 13
12 / 13
13 / 13
टॅग्स :सनी देओलबॉलिवूडडिम्पल कपाडियाइंटरेस्टींग फॅक्ट्स