HAPPY BIRTHDAY BEBO : करिना कपूरने दिली होती घरून पळून जाण्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 10:48 IST
तुमची आमची लाडकी अभिनेत्री करिना कपूर हिचा आज (२१ सप्टेंबर)वाढदिवस. बेबो आज ३७ वर्षांची झाली. बेबोच्या नावाने प्रसिद्ध करिना ...
HAPPY BIRTHDAY BEBO : करिना कपूरने दिली होती घरून पळून जाण्याची धमकी!
तुमची आमची लाडकी अभिनेत्री करिना कपूर हिचा आज (२१ सप्टेंबर)वाढदिवस. बेबो आज ३७ वर्षांची झाली. बेबोच्या नावाने प्रसिद्ध करिना चे नाव आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. जाणून घेऊ या तिच्या आयुष्याविषयी काही रोचक तथ्य...शिवाय करिनाच्या बालपणापासून तर आत्तापर्यंतचे काही फोटो... करिनाची आई जेव्हा गर्भवती होती तेव्हा अन्ना करेनीना नावाचे पुस्तक वाचत होत असून त्यातूनच करिनाचे नाव ठेवण्यात आले आहे. घरी सर्व तिला बेबोच्या नावाने हाक मारतात. करिनाने मीठीबाई कॉलेजातकॉमर्सची पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. पण नंतर लॉ करायचे आहे, म्हणून तिने मध्येच कॉलेज सोडले. करिनाने हार्वडमधून मायक्रो कम्प्युटरमध्से तीन महिन्यांचा कोर्स केला आहे. ‘जब वी मेट’मध्ये घरातून पळणारी करिना रिअल लाईफमध्येही घर सोडून पळून जाणार होती. होय, कुण्या दुसºयासाठी नाही तर सैफसाठी तिने घर सोडून पळून जाण्याची धमकी दिली होती. सलमान खानशी करिना कपूरची पहिली भेट झाली होती, तेव्हा करिनाची बहीण करिश्मा आणि सलमान एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. सलमानला बघून करिना फारच घाबरली होती आणि त्या वेळेस सलमानने तिच्याशी लहान मुलांनासारखा व्यवहार केला होता. नंतर हिच करिना सलमानची हिरोईन झाली. करिनाला सर्वात आधी राकेश रोशनने ‘कहो ना प्यार है’साठी साइन केले होते. पण काही दिवसांच्या शूटिंगनंतर करिना या चित्रपटातून बाहेर पडली. राकेश रोशन यांचा सगळा फोकस ऋत्विक रोशनवर होता. म्हणून करिना या चित्रपटातून बाहेर पडल्याचे मानले जाते. करिनाने ‘रिफ्यूजी’(2000)या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. यात अभिषेक बच्चन करिनाचा हिरो होता. त्याचादेखील तो पहिलाच चित्रपट होता. ‘देव’ चित्रपटात करिनाने अमिताभ बच्चन व फरदीन खानसोबत काम केले होते. या चित्रपटातील ‘जब नहीं आऐ थे’ या गाण्याला करिनाने आपला आवाज दिला होता. ‘चमेली’ चित्रपट करिनाच्या उत्तम चित्रपटांपैकी एक़ आधी तिने या चित्रपटाला नकार दिला होता. पण दुसºयांदा रोल आॅफर झाल्यावर तिने तो स्वीकारला. या रोलच्या तयारीसाठी करीना बºयाचदा मुंबईच्या रेड लाइट एरियात गेली होती आणि तेथील देहविक्रय करणाºया मुलींचे हाव-भाव वाचण्याचा प्रयत्न केला होता. करिना अभिनेत्रीच नाही तर उत्तम लेखिकाही आहे. ‘डोन्ट लूज युवर मार्इंड, लूज युवर वेट’ आणि ‘करिना कपूर: द स्टाईल डायरी आॅफ अ बॉलिवूड दीवा’ हे दोन पुस्तके रूजाता दिवेकर व रोशल पिंटोसोबत मिळून तिने लिहिली आहेत. करिनाला सोशल मीडिया आणि गॅजेट्स अजिबात आवडत नाहीत. करिना आणि शाहिद कपूरचा रोमांस बराच काळ चालला. शाहिदच्या म्हणण्यामुळे करिना शाकाहारी देखील झाली होती. पण हे नाते फार काळ टिकले नाही. ALSO READ : इतका ‘महाग’ आहे करिना कपूरचा मुलगा तैमूर की, प्रोड्यूसरला खर्च पेलवेना!२००७ मध्ये करिनाच्या सैफ अली खानची एन्ट्री झाली. ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर दोघे जवळ आलेत. यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. आता या दोघांना तैमूर नावाचा तुलगा आहे. गतवर्षी २० डिसेंबरला त्याचा जन्म झाला होता.