1 / 8सध्या कलाविश्वात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 2 / 8'कृष्णावतारम' हा पॅन इंडिया सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात संस्कृती जयना हिने मुख्य भूमिका साकारली आहे. संस्कृती या सिनेमात सत्यभामाच्या भूमिकेत आहे. 3 / 8या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. तेव्हापासूनच संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 4 / 8संस्कृती ही गुजरातच्या माजी महिला मुख्यमंत्री आणि सध्याच्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नात आहे. 5 / 8संस्कृती २७ वर्षांची असून तिने 'कृष्णावतारम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 6 / 8संस्कृती एक बिजनेसवुमनही आहे. १६ वर्षांची असतानाच तिने बिजनेसमध्ये पाऊल ठेवलं होतं. एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ती ओळखली जाते. 7 / 8संस्कृती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.8 / 8करिअर आणि पर्सनल लाइफमधील अपडेट्स संस्कृती चाहत्यांना सोशल मीडियावरुन देते. अनेकदा ती तिचे हॉट फोटोही शेअर करत असते.