दुबईत शाहरूख आणि गौरीचा अलिशान बंगला आहे. या बंगल्यासमोरचा एक स्टाईलिश फोटो गौरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
तिने डिझाईन केलेल्या इंटीरियरचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून गौरीने हा फोटो शेअर केला आहे. दुबईतील या बंगल्याचे फोटोशूट अलीकडे पार पडले. यादरम्यानचा एक फोटो गौरीने पोस्ट केला आहे. शिवाय त्यास ‘Photoshoot in our home .. Dubai @palm jumeira. Doorway , gateway having a curved head... An archway. My favourite design element @gaurikhandesigns’ असे कॅप्शन दिले आहे.
या फोटोत गौरीने काळ्या रंगाचे टॉप आणि रिप्ड जीन्समध्ये अतिशय स्टाईलिश अवतारात दिसतेय. गौरी आणि तिच्या बंगल्याचा हा फोटो एकदम झकास म्हणायला हवा.
गौरीच्या दुबईतील बंगल्याचे काही इनसाईड फोटोही आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. तुम्ही बघा...स्टाईलिश गौरीचा लॅविश बंगला...