Join us  

'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 6:52 PM

1 / 10
अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर एक प्रेम कथा' सिनेमाने २२ वर्षांपूर्वी इतिहास रचला. तारासिंगचं देशप्रेम आणि सकीनासोबतची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती.
2 / 10
गदर एक प्रेम कथा ज्या दिवशी रिलीज झाला त्याच दिवशी आमिर खानचा 'लगान'ही प्रदर्शित झाला. तरी दोन्ही सिनेमाने सुपरहिट कामगिरी केली.
3 / 10
सनी देओल सध्या 'गदर २' चं यश एन्जॉय करत आहे. ११ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'गदर २' ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत ५०० कोटींची मजल मारली.
4 / 10
२००१ साली आलेल्या 'गदर एक प्रेम कथा'चीच पुढची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली. मात्र पहिला 'गदर' हिट झाल्यानंतरही सनी देओलला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत.
5 / 10
याचं कारण सांगताना तो म्हणाला, 'गदरच्या आधी मला काहीच अडचण नव्हती. चित्रपट खूप हिट झाला आणि स्तुतीही झाली. पण तरी मला काम मिळत नव्हतं. याचं कारण म्हणजे जग बदलत होतं आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड बनत चालली होती.'
6 / 10
सनी देओलच्या 'गदर २' च्या कमाईत तिसऱ्या आठवड्यात 75 टक्के वाढ दिसली. सिनेमाने आतापर्यंत ४३८.७० कोटींची कमाई केली आहे. फिल्मने KGF २ च्या कमाईला मागे टाकले.
7 / 10
अर्थातच सनीच्या गदर २ ने मार्केट खाल्ल्याने सनी देओलचाही भाव वधारला आहे. विशेष म्हणजे यापुढे सनी देओल एका चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होतेय.
8 / 10
सनी देओलला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, सनी पाजीने सनी स्टाईल उत्तर दिलंय. पैशांची गोष्ट अतिशय खासगी असते, म्हणून यावर मी काही बोलू इच्छित नाही.
9 / 10
सध्या गदर २ चित्रपटाचं यश आम्ही एन्जॉय करत आहोत. जेव्हा कधी नवीन चित्रपट साईन करेन तेव्हा फीबाबत विचार करेन.
10 / 10
मला माझी किंमत माहिती आहे, आणि मी माझ्या किंमतीसोबत कधीही तडजोड करत नाही. याशिवाय माझं कुटुंब हीच माझी संपत्ती असल्याचंही सनी देओलने म्हटलं.
टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसिनेमाअमिषा पटेल