चित्रपटाच्या माध्यमातून तिचे झालेले कौतुक पाहता तुम्हाला वाटते का की, अनुष्का चित्रपटासाठी फर्स्ट चॉईस होती? खरंतर, फ्रिडा पिंटो हिला या भूमिकेसाठी दिग्दर्शकाला घ्यायचे होते. मात्र, तिने या चित्रपटाला नकार दिल्याने अनुष्काला या चित्रपटात घेण्यात आले. अनुष्का जेव्हा बोर्डवर आली तेव्हा चित्रपटातील भूमिकांमध्येही बदल झाले.
चित्रपटाच्या बाबतीत एवढे बदल होऊनही अनुष्काने असा परफॉर्मन्स केला की, तिचे चाहत्यांसह समीक्षकांनीही कौतुक केले आहे. या चित्रपटाला तिने एक आव्हान म्हणून स्विकारले होते.