शाहरूख खान- माहिरा खान
‘रईस’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटात शाहरूख खान पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. माहिरा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. माहिरामुळे ‘रईस’ सध्या वादात सापडला आहे. पण तरिही या नव्या-कोºया जोडीचा पडद्यावरील रोमान्स पाहायला प्रेक्षक आतूर आहेत.
हृतिक रोशन- यामी गौतम
हृतिक रोशन आणि यामी गौतम ही जोडी ‘काबील’ चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हृतिक व यामीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना भावलीय. ‘काबील’चा ट्रेलर,‘काबील’ची गाणी लोकांना आवडली. त्यामुळे या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास लोक आतूर आहेत.
सुशांतसिंह राजपूत - क्रिती सॅनन
सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या तुमच्या कानावर आल्याच असतील. लवकरच हे रिअल लाईफ लव्हबर्ड्स ‘राबता’ या आगामी सिनेमांत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहणे निश्चितपणे प्रेक्षकांसाठी एक ‘फ्रेश’ अनुभव असणार आहे.
तापसी पन्नू- अमित साध
शूजित सरकारच्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झालेय. येत्या फेबु्रवारीत हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात ‘पिंक’ फेम तापसी पन्नू आणि अभिनेता अमित साध ही फ्रेश जोडी लीड रोलमध्ये दिसणार आहे. घरातून पळून जाऊन लग्न करणाºया प्रेमी युगुलांना मदत करणारी एक वेबसाईट आणि यादरम्यानच्या गमती-जमती यात दिसणार आहेत. तापसी आणि अमित या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत.
अनुष्का शर्मा- दिलजीत दोसांझ
अनुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या चित्रपटात अनुष्कासोबत दिसणार आहे, तो दिलजीत दोसांझ. अनुष्का व दिलजीत या फ्रेश जोडीला पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी एक नवा-कोरा अनुभव असणार आहे.
दीपिका पादुकोण- शाहिद कपूर
संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. दीपिका पादुकोण व रणवीर सिंह या रिअल लाईफ लव्हबर्ड्सची आॅनस्क्रीन केमिस्ट्री याआधीही तुम्ही बघितलीय. ‘पद्मावती’ मध्येही दीपिका-रणवीर दिसणार आहे. त्यामुळे त्यात आताश: काहीही फ्रेश राहिलेले नाही. पण दीपिकाचा शाहिद कपूरसोबतचा आॅनस्क्रीन रोमान्स मात्र नक्कीच तुम्हाला फ्रेश करू शकतो. ‘पद्मावती’च्या निमित्ताने दीपिका व शाहिद प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहेत.
आयुष्यमान खुराणा- परिणीती चोप्रा
अक्षय रॉय दिग्दर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ या आगामी चित्रपटात अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा यांचा रोमान्स रंगणार आहे. ही जोडी प्रथमच एकत्र येणार आहे. आयुष्यमान व परिणीतीला ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना किती भावते, तेही लवकरच कळणार आहे.
related stories : यंदाही असतील नायिकाचं ‘हिरो’!
या ‘Ex-Lovers’चा ‘आॅनस्क्रीन रोमान्स’ पाहण्यासाठी व्हा सज्ज!!